आर्टिफिशियल इंटेलिजन्सी AI आणि आजचे शिक्षक शिक्षण
मानसशास्त्रामध्ये बुद्धिमत्ता ही मानवाच्या वर्तनावर आधारलेली एक संकल्पना आहे. मानवी बुद्धिमत्तेचे घटक विचारात घेत असताना सुरुवातीला ते दोन होते, त्यानंतर हळूहळू वाढत बुद्धिमत्ता ही बहु घटक झाली आहे. बुद्धिमत्तेच्या घटकांचा विचार करता त्याला निश्चितच मर्यादा आहे त्यामधून भावनिक बुद्धिमत्ता शिक्षणाला उपयुक्त आहे हे सिद्ध झाले.व्यक्तिगत बुद्धिमत्तेबरोबर भावनिक बुद्धिमत्तेला शिक्षणामध्ये सुयोग्य असे स्थान उपलब्ध झाले त्याचे कारण शिक्षण हे केवळ बुद्धिमत्तेवर आधारलेले नाही तर त्याला भावनिक बुद्धिमत्तेची जोड हवी. बुद्धिमान व्यक्तीला समाजामध्ये निश्चितच वरचे स्थान दिले जाते.
संगणक युगामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञान युगामध्ये संगणकाची व्याख्या करत असताना सुरुवातीला ती अशी करण्यात आली की 0 बुद्धी गुणांक असलेले मानवनिर्मित यंत्र की जय मानवाने दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून योग्य असे उत्तर देते. संगणकाला 0 बुद्धिगुणांक असलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र असे म्हटले जात होते. परंतु संगणकाचा वापर जसजसा विविध क्षेत्रांमध्ये होत गेला तस तसा त्याचा बोल बाला वाढत गेला. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक वापरला जात आहे. त्यामधूनच कृत्रिम बुद्धिमत्ता ही नवीन संकल्पना पुढे आली.कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली.कृत्रिम वस्तू
साधरणत:
संगणकच
असते. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात विशेषता समाज माध्यमात AI साधने विकसित झालेली पाहतो. त्यामध्ये चित्र, व्हिडिओ चा वापर आपणाला अधिक पाहायला मिळतो. यामुळे काही संधी उपलब्ध होतील तर काही जणांचे व्यवसाय बंद पडतील असे बोलले जाते. ते कितपत योग्य आहे ? काही जाहिराती आपण अशाही पाहतो की शाळेमध्ये शिक्षकाऐवजी रोबो चा वापर करून अध्यापन करणारी आमची पहिली शाळा? खरंच रोबो विद्यार्थ्यांना शिक्षकापेक्षा उत्तम दर्जाचे शिक्षण देत असेल का? गुगलने तयार केलेले लेन्स हे एक प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे चांगले उदाहरण आहे. अलेक्सा याचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो ही कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे का? Gamma AI हे एप्लीकेशन पावर पॉइंट प्रेसेंटेशन साठी वापरणे सहज सोपे झाले आहे. हे मोफत अप्लिकेशन शिक्षकाला PPT बनवण्यासाठी कमी वेळेत आणि आकर्षक सादरीकरणासाठी उपयुक्त ठरत आहे. सादरीकरण बनवत असताना जरी वेळ कमी लागत असला तरीसुद्धा अचूक डेटा देण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे म्हणजेच शिक्षक जेवढा नेमकेपणाने डेटा सॉफ्टवेअरला देईल तितकेच दर्जेदार आपलिकेशन काम करून आपणाला देईल किंवा सादरीकरण दर्जेदार होईल.
विज्ञानातील प्रयोग करत असताना आभासी प्रयोगशाळा किंवा वर्चुअल लॅबोरेटरीज गुणवत्तापूर्ण कौशल्य आधारित शिक्षण देण्यास समर्थ आहेत का? या सर्वांचा विचार शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या शिक्षकांना करावा लागणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेची भीती न बाळगता कौशल्याधारित शिक्षणासाठी मानवी मेंदू कसा अधिक कौशल्य पूर्ण काम करू शकतो. याचा विचार आपणाला करावा लागणार आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे अति तिथे माती. मूलभूत कौशल्य शिकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निश्चितच मर्यादा आहेत त्यामुळे प्राथमिक अध्ययन कौशल्य आत्मसात करण्यासाठी मानवाला स्वतःची बुद्धी आणि कर्तृत्व म्हणजेच कार्यक्षमता दाखवून द्यावी लागेल. मानवी बुद्धिमत्ता ही संगणक बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे त्यामध्ये मानवाकडे असलेली आणखीन एक बुद्धिमत्ता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.
कृत्रिम बुद्धिमत्ता जर आपण योग्य प्रकारे वापरली तर मानवाला ते वरदान ठरेल. शिक्षक प्रशिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत असताना प्रशिक्षणार्थी आणि शिक्षक प्रशिक्षक यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अध्यापनाचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने माहिती तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनामध्ये चिकित्सक वापर व्हायला सुरुवात होईल. हे काम भारतीय युवक नक्की करतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असलेली मर्यादा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता तिची जोड देऊन बहुजनांना दर्जेदार कौशल्य आधारित शिक्षण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतील.
महाकाय सुपर संगणक निर्मिती ही एका माणसाचे कार्य नव्हते.अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन एक संस्था निर्माण केली आणि भारतामध्ये डॉ.विजय भटकर यांच्या नेतृत्वाने परम १०००० सुपर कॉम्प्युटरची निर्मिती केली.परम १०००० सुपर संगणकाने मानवाच्या अनेक गरजा सोडविण्याचेच काम केलेले होते डॉ.विजय भटकर हे त्याचे शिल्पकार ठरले.
आज जगापुढे अनेक मतमतांतरे आहेत, ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यशैली बाबत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या व्यक्तिगत कार्यपद्धतीवर आघात करेल का? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवाचे रोजगार तर काढून घेतले जाणार नाहीत ना या सर्वांचे एकच उत्तर म्हणजे जसे सुपर कम्प्युटर मानवाने बनवले तशीच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकामध्ये मानवच बनवणार आहे त्यामुळे संगणकाची बुद्धिमत्ता ही मानवाच्या बुद्धीमध्ये पेक्षा कधीही अधिक असणार नाही.येणाऱ्या काळामध्ये संगणकाच्या मदतीला मानवाची बुद्धिमत्ता अधिक जोमाने कार्य करेल आणि संगणकाचे कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाला दर्जेदार बनविण्यासाठी, शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी भविष्यकाळात उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.
