Wednesday, 21 September 2022

School girl child empowerment through technical education

*सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती उपक्रम* 
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 
*School girl child empowerment through technical education*.
दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी श्रीमंत विनायकराव उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव येथील अभियंता दिन साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये तंत्रशिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विशेषता मुलींच्या शिक्षणासाठी बी.एड प्रशिक्षणार्थ एक उपक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये सर विश्वेश्वराय यांच्या जीवनावर व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. तासगाव येथील शासकीय मुलींचे निवासी तंत्रनिकेतन मधील प्राध्यापिका टी एम जाधव मॅडम यांनी तंत्रशिक्षणामध्ये मुलींना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या वरती व्याख्यान दिले. तसेच आजचे युग हे मुलींना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देण्याच्या आहे यावर भर दिला. व्यावसायिक शिक्षणाच्या संधी मिळविण्यासाठी ड्रेस डिझायनिंग सारखा कोर्स कसा उपयुक्त आहे याची माहिती सांगितली. चंपाबेन वाडीलाल प्रशाला येथील प्रयोगशाळा शिक्षक श्रीयुत माळी यांनी अटल विज्ञान तंत्रज्ञान प्रयोग शाळेबद्दल माहिती सांगत असताना मेकिंग ऑफ रोबो याचे सादरीकरण केले तसेच 3D  प्रिंटिंग कशी करायची हेही सांगितले. हे सांगत असताना प्रत्यक्ष थ्रीडी प्रिंटरचा वापर केला आणि काही मॉडेल्स दाखवली अशाप्रकारे सर विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याची काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे

2 comments: