ऑनलाइन टिचिंग अँड लर्निंग
आज शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक बदल करणे क्रमप्राप्त झाले आहे. कोरोनामुळे माणसाचे जीवनमान बदलले आहे. अनेक संकटाला मानवजात सामोरी जात आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणात खंड पडू द्यायचा नसेल तर आपणाला आधुनिक किंवा काळाबरोबर जाणारी शिक्षण व्यवस्था स्वीकारणे काही काळासाठी तरी गरजेचे वाटू लागले आहे. त्यामधूनच ऑनलाइन टीचिंग अँड लर्निंग याचा विचार होऊ लागलेला आहे. विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी ऑनलाईन पद्धती जर प्रभावीपणे वापरावयाची असेल तर त्यासाठी शिक्षकाने सुद्धा अगोदर आपल्यामध्ये काही बदल करून घेणे महत्वाचे वाटते.
शिक्षक स्वतः टेक्नोसॅव्ही असला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑनलाइन टिचिंग बाबत सकारात्मकता हवी. विद्यार्थी शिकेल की नाही याबाबत कोणतीही शंका कुशंका मनामध्ये न ठेवता माझा विद्यार्थी शिकणारच ही भावना असली पाहिजे. सर्व शिक्षक तात्काळ टेक्नोसॅव्ही होतीलच असे नाही त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न करत असताना मोबाईल वरील विविध आपलिकेशन आत्मसात करणे गरजेचे वाटते जसे की ध्वनिमुद्रण करणे, व्हिडिओ तयार करणे, चाचणी तयार करणे, आणि तयार केलेली साधने विद्यार्थ्या पर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे यासाठी Youtube,testmoz,google form,blog यांचा वापर आपणाला करता येईल. या साधना बरोबरच महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तक मंडळाच्या वेबसाईटवर पीडीएफ पुस्तके ठेवलेली आहे या पुस्तकाद्वारे आपणाला शिकविता येणे शक्य नाही का ? याचा विचार करावा. मोबाईलचा अतिवापर हा शरीराला घातक आहे परंतु सुनियोजन केल्यास ते एक काही काळासाठी पूरक साधन ठरू शकते. मोबाईल शिक्षकाची जागा कधीही देऊ शकणार नाही परंतु आज शिक्षण तर सुरू राहिले पाहिजे यासाठी पूरक साधन म्हणून मोबाईल वापरणे गरजेचे वाटत नाही का ? शिक्षक नेहमीच समाजाचा मार्गदर्शक ठरलेला आहे. आजच्या कठीण परिस्थितीत शिक्षकाने समाजाला आणि शिक्षण व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी सज्ज होणे आवश्यक वाटते शालेय स्तरावर असे प्रयोग होताना मनस्वी आनंद होतो. ही प्रक्रिया थांबणार नाही असा विश्वास मनामध्ये वाटतो. त्याबद्दल ग्रामीण भागातील शिक्षणापासून ते शहरी भागातील शिक्षकांचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा या नवीन तंत्राचा वापर जर डोळस पणे केलात तर आपल्या मनात शिक्षणाच्या बाबत मागे पडण्याची भीती निर्माण झाली आहे ती दूर होत जाईल.
भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे दर्जेदार शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. काळ वाईट असला तरीसुद्धा त्याच्यावर मात करण्याची जबाबदारी ही युवकांचे असते असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेले आहे तेव्हा कोरोना निश्चित कधी तरी जाणारच पण आपले जीवन थांबून चालणार नाही त्यासाठी ऑनलाइन टीचिंग लर्निंग चा वापर कराल अशी अपेक्षा.
Monday, 6 July 2020
online learning and teaching
Subscribe to:
Post Comments (Atom)
आदरणीय पाटील सरांनी वरील लेखामध्ये जे मत व्यक्त केलेले आहे त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. सध्याच्या काळामध्ये Teaching, learning and evaluation process मध्ये
ReplyDeleteOnline पद्धतीचा वापर करणे अत्यावश्यक झालेले आहे. त्याचा स्वीकार करणे आपणास क्रमप्राप्त आहे.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे या न्यायाने काळ जसा जसा बदलेल तशी समाज बांधणी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेला बदल करणे आवश्यक आहे,हा बदल म्हणजे पारंपारिक कडून ऑनलाइन कडे प्रवास करणे आता क्रमप्राप्त झाले आहे,आपण आपले मत छान मांडले आहे, धन्यवाद सर
ReplyDelete