यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.नाशिक हे कष्टकऱ्यांचे, कामगारांचे आणि निरंतर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्याचे विद्यापीठ. त्यामुळे ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊ घेऊन आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांना चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे मातृभाषेतून म्हणजेच माय मराठीतून शिक्षण देण्याचे पवित्र कार्य या विद्यापीठाने केलेले आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.प्राध्यापक राम ताकवले सर, नामवंत संशोधक आणि उत्तम प्रशासक. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या विद्याशाखांची स्थापना
केली. हे
करत असताना त्याचा समाजाला आणि शिक्षण क्षेत्राला
उपयोग झाला पाहिजे, या विचारातून शिक्षणशास्त्र विद्या शाखा निर्माण झाली.
डॉ. अनंत जोशी जोशी सरांनी सुरुवातीच्या काळामध्ये पुणे आणि कोल्हापूर येथे आपले शैक्षणिक काम अत्यंत तळमळीने केलेले होते सरांनी अनेक विद्यार्थी घडविले. डॉ. अनंत जोशी सरांची ओळख शिवाजी विद्यापीठात त्यांनी केलेल्या सूक्ष्म अध्यापनाच्या उपयोजित संशोधनातून झालेली होती. शिवाजी विद्यापीठामध्ये 90 च्या दशकात अनेक प्रयोग शिक्षणशास्त्रामध्ये केले गेले त्यामधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला गेलेला प्रयोग म्हणजे सूक्ष्म अध्यापन कौशल्य. सूक्ष्म अध्यापन कौशल्य वापरून सेवा पूर्व आणि सेवांतर्गत शिक्षकांना अध्यापनाचा दर्जा कसा सुधारता येईल यासाठी ते सतत कार्यरत राहिले आणि अनेक शिक्षकांना
त्यांनी त्यामध्ये समाविष्ट करून घेतले. अतिशय प्रामाणिकपणे केलेले हे संशोधन कार्य
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपयोगी ठरले म्हणूनच असे म्हणाले वाटते की, ते संशोधन सामान्य
पर्यंत पोहोचले आणि त्याचा उपयोग सेवा पूर्व प्रशिक्षणार्थींना निश्चित झाला. त्यानंतर जोशी सरांनी यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विभाग प्रमुख म्हणून आणि प्रयोग केले
त्यामध्ये शिक्षण शास्त्र विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन
साहित्य निर्मिती हे एक होते. त्यासाठी
महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर येईल मराठी भाषा उत्तम जाणाऱ्या तज्ञ व्यक्तीकडून
दर्जेदार शिक्षण शास्त्राचे साहित्य निर्माण करून घेण्यात मोलाचे योगदान जोशी सरांनी
दिलेल्या आहे.
एखादी व्यक्ती विद्वान असेल तर ते नम्र असतेच असे नाही पण विद्वत्ता आणि नम्रता यांचा सुरेख संगम म्हणजे आदरणीय अनंत जोशी सर. सरांचे आजचे वय 75 वर्षाच्या पुढे आहे. परंतु चेहऱ्यावरती असलेल्या आत्मिक समाधान पाहून मला दत्त जयंतीचा दत्त पाहायला मिळाला, हे भाग्य माझे गुरुवर्य डॉ. ह. ना जगताप यांच्यामुळे मला मिळाले. ज्यावेळी जगताप सर जोशी सरांशी बोलत होते त्यावेळी तुझं काय चाललंय प्रश्न विचारला, तेव्हा एखाद्या लहान मुलासारखे जोशी सर पुन्हा दुसऱ्या खोलीत गेले आणि काही छापील कागद घेऊन बाहेर आले त्यावरती त्यांनी भगवद्गीतेतील दोनशे श्लोक निवडून त्याचे भारतीय तत्त्वज्ञानातील स्थान याचा मी अभ्यास करत आहे लेखन करत आहे असे सांगितले शरीर थकलेले असतानाही श्रीकृष्ण ज्याच्या पाठीमागे उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर तेजा शिवाय दुसरे काय असणार आहे.
एक मित्र जेव्हा दुसऱ्या मित्राला भेटतो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये टिपता येत नाही. वाचन लेखन आणि चिंतन यामधून दोन्ही मित्र एकमेकांच्याकडे विचारांची देवाण-घेवाण करत होते ते पाहिल्यानंतर दत्त जयंती साजरी केल्याचे समाधान मला मिळाले हेच मी माझे भाग्य समजतो आदरणीय जोशी सरांना उत्तम आरोग्य लाभो हे सद्गुरुकडे प्रार्थना करतो.

मैत्री आणि अभ्यास व्यक्तीला चिरतरुण ठेवतात याची प्रचिती येते.
ReplyDelete